उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची जोरदार धडक.! चालक गंभीर जखमी...

उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची जोरदार धडक.! चालक गंभीर जखमी...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील तुमसर - रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील ऊसर्रा गाव पुलावर ट्रक क्रमांक 25 U 1088 या ट्रकचा मागचा टायर फुटल्याने; दोन दिवसापासून ट्रक बंद अवस्थेत राष्ट्रीय महामार्गावर उभा होता. रामटेक कडून तुमसरकडे सिमेंट वाहतूक करणाऱ्या MH35 AH 1899 क्रमांकाच्या दुसऱ्या ट्रकने उभ्या ट्रकला मागून जबर धडक दिल्याने, ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाला.

ही घटना दि.26 मे ला दुपारून 2 वाजेच्या दरम्यान घडली असून,सदर अपघातात मागून धडक देणाऱ्या ट्रकचा केबिन चेंदामेंदा होऊन ट्रक ड्रायव्हर केबिनमध्येच अडकून पडला होता.सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी गर्दी केली व चार तास कटोकाठ प्रयत्न करीत ट्रक ड्रायव्हरला केबिन मधून सुरळीत काढून उपचाराकरिता सुभाष चंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल केले. पुढील तपास आंधळगाव पोलीस करित आहे