उन्हाच्या तडाख्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान...

उन्हाच्या तडाख्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान...

प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर ची केळी देशभरात प्रसिद्ध असून, जळगाव आंध्रा विजयवाडा नंतर नांदेडच्या अर्धापूर केळी उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आणि कर्जबाजारी झाला.

गेल्या महिनाभरापासून नांदेड जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअस एवढे असून, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. यातच अर्धापुर तालुक्यातील लतिफपुर बेचीराख येथील दिग्विजय निळेकर यांची शेती असून, त्यांनी 3 हजार केळीच्या झाडांची लागवड केली होती. या झाडांना फळ लागून घड पडायची वेळ आली आहे. तीव्र उन्हामुळे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे या झाडांची नासधूस होत आहे. हे झाडं वाळून जात आहेत. झाडं दाड्यातुन वाळून कोलमडून पडत आहेत. या झाडांतून 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे.! मात्र या वर्षी येवढे सुध्दा उत्पादन होईल की नाही असे या शेतकऱ्याचे म्हणने आहे. या नुकसानीतुन शेतकऱ्याचे आर्थिक संकटात सापडले असून, यात आता शासनाने काही तरी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.