मोठी बातमी : खराबवाडी गावात दुचाकीने भरलेल्या कंटेनरला भीषण आग..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील इंडियन पेट्रोल पपांच्या जवळ पहाटेच्या वेळी डिझेल भरण्यासाठी आलेल्या कंटेनरला अचानक भीषण आग लागल्याने कंटेनर मधील एकूण ४० इलेट्रिकल दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

तळेगाव-चाकण रस्त्यावर खराबवाडी गावातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर NL-01AE-7346 नंबरचा कंटेनर डिझेल भरण्यासाठी आला होता. कंटेनर चालकाने डिझेल भरण्यासाठी मालकाला फोन केला असता. मालकाने फोन न उचल्याने कंटेनर पेट्रोल पंपाच्या बाजूला पार्क केला. त्यानंतर काही वेळात एका रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने चालकास कंटेनर मधून धूर येत असल्याची माहिती दिली. त्यावर चालकाने कंटेनरचा मागील दरवाजा उघडला असता आगीचे लोळ बाहेर पडले. यात ४० इलेट्रिकल दुचाकी होत्या. त्या सर्व दुचाकी जळून खाक झाल्या कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी तातडीने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस, खराबवाडी गावचे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील किरण किर्ते यांच्यासह अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टाळला.