लातुर - नांदेड महामार्गावरील दिशादर्शक कमान कोसळून एकाचा मृत्यू...
![लातुर - नांदेड महामार्गावरील दिशादर्शक कमान कोसळून एकाचा मृत्यू...](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_6664748a5a424.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
लातूर - नांदेड 361 या महामार्गावर आज शनिवारी दि.८ रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान; एक दुर्दैवी घटना (अपघात) झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिरूर ताजबंद जवळ असलेल्या थोरलेवाडी पाटीजवळ महामार्गावरील दिशादर्शक कमान कोसळल्याने यावेळी झालेल्या अपघातात रस्त्यावरून मोटरसायकल क्र. MH20 BH7701 ने जात असताना आष्टा (ता. चाकूर) येथील मृदंग वादक ज्ञानेश्वर बालाजी साके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनास्थळी अहमदपुर पोलीस दाखल झाले आहेत.