धक्कादायक घटना.! मराठा आरक्षणासाठी नदीत उडी घेऊन, युवकाची आत्महत्या...

धक्कादायक घटना.! मराठा आरक्षणासाठी नदीत उडी घेऊन, युवकाची आत्महत्या...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील अनेक दिवसांपासून संघर्ष करत असून, मराठा समाजाचा त्यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. एकीकडे आरक्षणासाठी समाज एकत्र येत असताना; दुसरीकडे मात्र समाजातील अनेक युवक टोकाचे पाऊल उचलत आहेत. तर शेकडो युवकांनी आत्ता आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

पुन्हा असाच एक धक्कादायक प्रकार घडला असून, समाजाच्या आवाहनानंतरही हे आत्महत्येच सत्र थांबेना झालं आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका येथील दिग्रस कोंढूर येथे मराठा तरुणाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरदास सुर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या तरुणांच नाव आहे. घटनेनंतर तरुणांच्या खिशात एक चिट्टी सापडली असून, आपण मराठा आरक्षणाच्या मागणी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्या चिठ्ठीत करण्यात आला आहे. या प्रकरणी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.