आनंदवाडी येथील वंगे विद्यालयात विद्यार्थीकडून खरी कमाई उपक्रम साजरा...

आनंदवाडी येथील वंगे विद्यालयात विद्यार्थीकडून खरी कमाई उपक्रम साजरा...

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी शिरूर अनंतपाळ (लातूर)

श्रमप्रतिष्ठा व केलेल्या श्रमाचा योग्य तेवढाच मोबदला घ्यावा ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी स्काऊट व गाइडच्या माध्यमातून खरी कमाई केली जाते . हा उपक्रम 10 डिसेंबर ते 10 जानेवारी सेवा महोत्सव सुरु असून त्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील संस्कार वर्धिनी पार्वतीबाई वंगे विद्यालय आनंदवाडी येथे खरी कमाईचे स्टॉल लावून उपक्रम साजरा करण्यात आला.

खरी कमाई या महोत्सवाचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक डी. जी. शिरूरे यांच्या हास्ते झाले. यावेळी शाळेतील शिक्षक संदिपान गुरमे, बाळासाहेब बानाटे, प्रभाकर घाडगे, एस.व्ही. सूर्यवंशी, श्रीमती अंजली चेवले, संध्याताई कुंटे, लता बच्चेवार, लक्ष्मी मानुरवार, धोंडीराम कांबळे, हाणमंत मानूरवार यांच्यासह शेकडो विद्यार्थी, पालकांचा मोठा सहभाग दिसून आला.