वादळी पावसात गोठा कोसळून लाखोचे नुकसान.! ८ ते १० दुधाळू जनावरे जखमी...
प्रतिनिधी - सुधीर शिवणकर,गोंदिया
सध्या गोंदिया जिल्ह्यात पावसाने थैमान घातला असून, नदी - नाले तुडुंब भरले आहेत.
अशातच दि.15 जुलै च्या रात्री आलेल्या पावसाने पिपरी/ राका येथील प्रगतशील शेतकरी देवदास तरोने यांच्या आठ ते दहा चांगल्या जातीच्या दुधाळू जनावरांवर गोठा पडल्याने; यात जनावरे गंभीर जखमी झाली असून, शेतकरी देवदास तरोने यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तर या घटनेची दखल घेत प्रशासनाने सदर जनावरांचे मोफत उपचार करून, शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
