वलांडी येथील महावितरण कार्यालयास हेळंब येथील शेतकऱ्यांनी ठोकले टाळे...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी देवणी (लातूर )
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनेगाव, हेळंब परिसरात होणारा वीजपुरवठा सुरळीत करा; या प्रमुख मागणीसाठी हेळंब येथील शेतकऱ्यांच्यावतीने वलांडी येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकून निषेध नोंदविण्यात आला.
खरीप हंगामाची पिके पावसा अभावी सुकू लागली आणि त्यात गेल्या आठवडाभरापासून हेळंब, धनेगाव फाट्याला थ्री फेस वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने, शेतकऱ्यांची विद्युत मोटारी चालत नाहीत. पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी शिवारातील पिके कोमेजून जात आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी वलांडी महावितरणला माहिती देऊनही; याकडे महावितरणने दुर्लक्ष केले. याला वैतागून अखेर शेतकऱ्यांनी वलांडी महावितरण कार्यालयास टाळे ठोकून निषेध नोंदवला. यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने वलांडी महावितरण कनिष्ठ अभियंता श्रीनिवास वांगवाड यांना निवेदन देण्यात आले व पुढील दोन दिवसात विधूत पूरवठा सूरळीत करा अन्यथा वलांडी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा व रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आला.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सूरेंद्र अंबूलगे, माधव सावत, उपसरपंच सोपान सिरशे, माजी सरपंच गुणवंत सावंत, रहीम मूल्ला, विजय शिंदे, सिरसे राहूल यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.