ढगाळ वातावरणामुळे डोंगरची काळी मैना संकटांत.! ऐन उन्हाळ्यात खवय्यांची होणार निराशा...

ढगाळ वातावरणामुळे  डोंगरची काळी मैना संकटांत.! ऐन उन्हाळ्यात खवय्यांची होणार निराशा...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भाग म्हणजे पेठ, सुरगाणा,कळवण,त्र्यंबकेश्‍वर, इगतपूरी तालुका होय.विविध साधन संपत्तीने नटलेल्या या तालुक्यांना निसर्गाची एक खास वैभवशाली प्राप्त झाली आहे.तीनही ऋतूत जंगलात मिळणारा अनेक प्रकारचा रानमेवा आदिवासी भागासह शहरातही मोठ्या प्रमाणात भुरळ घालत आहे.परतुं यंदा ढगाळ व विभिन्न वातावरणामुळे करवंदाची फुले,मोहाची फुले गळून पडली.तर काही फुले व मोहोर उन्हाच्या तडाक्याने जळुन गेली. यामुळे जंगलातील अनेक साधन संपती धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे यंदा जंगलातून मिळणारा रानमेव्यांची उपलब्धता कमी होऊ शकते.जंगलातच राहुन रोजगार मिळविणार्‍या मजुरांना मात्र अशा विभिन्न वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.तसेच रान-वनांतून रोजगारावर अवलंबून असणार्‍या मजुरांचीही निराशा झाल्याचे बघायला मिळते आहे. दरवर्षी ज्या वेगाने जंगलातील रानमेवा बाजारात दाखल होत होता. त्या वेगाने यावर्षी मात्र संथता(उशीरा) बघायला मिळते.उन्हाळ्यात टेंबूर्णिचे फळे,मोहट्या,रानटी आंबे,करवंदे व पावसाळापूर्व आणि पावसाळा दरम्यान जांभळे,आळवा आदी फळांची चव चाखण्यासाठी डोंगराळ भागात व बाजारात गर्दी नेहमी असायची.परतुं, यंदा मात्र खवय्यांची मोठी निराशा झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.