उबाठा गटाचे खेड तालुक्याचे नेते बाबाजी काळे यांच्या मुलाच्या लग्नात तोबा गर्दी, आमदारकीची रंगीत तालीम...!

उबाठा गटाचे खेड तालुक्याचे नेते बाबाजी काळे यांच्या मुलाच्या लग्नात तोबा गर्दी, आमदारकीची रंगीत तालीम...!

News15 मराठीसाठी आशिष ढगे पाटील

खेड (राजगुरूनगर) : माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा उबाठा गटाचे खेड तालुक्याचे नेते बाबाजी काळे यांच्या मुलाच्या लग्नाला अक्षरशः तालुक्यातील कानकोपऱ्यातून सर्व सामान्य जनतेने हजेरी लावून मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे बाबाजी काळे यांच्या आमदारकिची रंगीत तालीमच म्हणावी की काय? अशी चर्चा उपस्थित मान्यवर यांच्यामध्ये रंगली होती.

खेड तालुक्याचे उबाठा गटाचे नेते बाबाजी काळे यांनी दोनही मुलांची सोयरीक तालुक्यातच जमवून एक प्रकारे भविष्यातील राजकारणाची जुळवा जुळव केल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. बाबाजी काळे यांना २०२४ चे खेड -आळंदी मतदारसंघांचे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बाबाजी काळे यांचा तालुक्यातील जनसंपर्क बघता ते तालुक्याच्या आमदारकीच्या यादीत अग्रभागी असल्याचेही दिसून येत आहे. त्यातच त्यांच्या मुलाच्या लग्नातील गर्दी बघता बाबाजी काळे आमदारकीची बारी बसवतात की काय? अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

बाबाजी काळे यांचे छोटे चिरंजीव मृण्मय हेही तालुक्यातील राजकारणात सक्रिय असल्याने त्यांचाही तरुणांशी दांडगा जनसंपर्क असल्याने लग्नाला मान्यवरांची मोठी मांदियाळी पहावयास मिळाली.

विशेष करून या लग्न सोहळ्यास महाविकास आघाडीचे राज्यातील प्रमुख नेतेही उपस्थित असल्याने बाबाजी काळे यांची भविष्यातील राजकीय भूमिका काय असेल याबद्दलही उपस्थितीत तर्क वितर्क बांधत होते. काहीही असूदेत पण आजच्या लग्न समारंभावरून बाबाजी काळे यांनी तालुक्यातील त्यांची वेगळी ताकद आणि जनसंपर्क दाखवून देऊन आमदारकी खेचून आणण्याची तयारी केल्याचे दिसून आले आहे. आता यात भविष्यातील राजकीय गणिते काय असतील त्यानुसार खेड तालुक्याचा पुढील आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हेच पहावे लागेल.