दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांना अभिवादन...

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांना अभिवादन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे दिंडोरी पेठ तालुका संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली; दिंडोरी नगरपंचायत नगरसेवक सुजित मुरकुटे, उपप्राचार्य उत्तम भरसट, पर्यवेक्षिका प्रतिभा मापारी, श्रीमती सविता शिंदे, रावसाहेब उशीर, विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत होते. कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.     

कार्यक्रमाचे अध्यक्ष दिंडोरी पेठ तालुका संचालक प्रवीण जाधव यांनी देखील" कर्मवीर डॉ. वसंतराव पवार हे एक अतिशय महान विभूती ज्यांना डॉ. बीसी रॉय पुरस्कार मिळाला ज्यांनी अनेक वेळा रक्तदान केले  अनेकांचे प्राण वाचवले या संस्थेमध्ये काम करत असताना अनेकांचे प्रपंच फुलवले उच्च पदावर असून देखील प्रत्येक कार्यातून माणसाच्या मनामनात आपले विचार व कर्मवीरांची भूमिका रुजवत राहिले बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून आपल्या कारकिर्दीमध्ये कर्मवीरांच्या विचारांचा ठसा मनात जोपासत समाजकारण राजकारण शैक्षणिक वृद्धी या सर्व गोष्टीत त्यांनी स्वतःला झोकून देऊन कार्य केलं.आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या विचारांचा वारसा हा नक्कीच घेतला पाहिजे चांगले विचार आपला जीवन मार्ग प्रकाशमय करत असतात डॉक्टर वसंतराव पवार यांनी अनेकांचे विचार एकत्र करून आपल्या कृती मधून महान असं कार्य केलं वैद्यकीय महाविद्यालय संस्थेचा नावलौकिक वाढवण्यासाठी ते मिळवून आणले तसेच संस्थेमध्ये विविध शाखा तंत्रज्ञान विकसित करण्यामागे डॉक्टर वसंत पवारांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तसेच डॉक्टर वसंतराव पवार एक मातीतला माणूस मातीला मातृभूमीला ते कधीच विसरत नव्हते स्काऊट गाईड मेळाव्यांमधून सुद्धा डॉक्टर वसंतराव पवार खऱ्या अर्थाने स्काऊटचे जीवन जगत असत स्काऊट मध्ये रममान होत असंत त्यांनी 2007 मध्ये घेतलेला नाशिक येथील राज्य मेळावा हा खरोखर आदर्श मेळावा होऊन गेला त्यांच्या कार्याच्या अनेक स्मृती या आजच्या दिनी जागृत होतात विद्यार्थ्यांनो आपण सगळ्यांनी या महान विभूतींच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणतेही कार्य करा यशाच्या शिखर हे आपलंच असतं संस्थेचा नावलौकिक मोठा करण्यात आपण नाममात्र हातभार लावला तरीसुद्धा आपण कर्तव्य पूर्ण केल्याचा एक आनंद मिळवू शकू प्रत्येकाने आपल्यातले वाचन वाढवा हीच प्रेरणा त्यांच्या या प्रेरणा दिनातून आपण घेऊ या."असे बहुमोल मार्गदर्शन उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. विरकर यांनी केले तर आभार संतोष कथार यांनी  मानले.