खेड तालुक्यातील SSC विज्ञान प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेची गुणपत्रके वेळेत जमा...

खेड तालुक्यातील SSC विज्ञान प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेची गुणपत्रके वेळेत जमा...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, खेड

पुणे जिल्हा उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या SSC बोर्ड परीक्षा 2026 अंतर्गत घेण्यात आलेल्या विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे गुणपत्रक जमा करण्याची प्रक्रिया खेड तालुक्यात यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

खेड तालुक्यातील सर्व शाळांची विज्ञान प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर दि. ५ मार्च २०२६ रोजी सर्व शाळांनी आपले गुणदान तक्ते व गुणपत्रके भैरवनाथ विद्यालय, पाबळ येथे जमा केली.

या प्रक्रियेत खेड तालुक्यातील सुमारे १५० ते १६० शाळांनी दहावी विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणदान तक्ते वेळेत जमा केले. सर्व शाळांनी नियमानुसार व वेळेत कामकाज पूर्ण केल्यामुळे पुणे विभाग SSC बोर्डाकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

या केंद्राच्या कामकाजासाठी भैरवनाथ विद्यालय पाबळ येथील केंद्रप्रमुख तुकाराम ताम्हाणे सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व शिक्षकांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला.

यावेळी आदर्श मुख्याध्यापक उत्तमराव पोटवडे, टोपे सर, चंद्रकांत होले, सुधीर दसगुडे, दीपक पोखरकर, संतोष गाडेकर, बजरंग मुंडे, राजू चौधरी यांच्यासह खेड तालुक्यातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेड तालुक्यातील सर्व शाळांनी समन्वयाने व वेळेत काम पूर्ण केल्यामुळे परीक्षेसंबंधित प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे यावेळी सांगण्यात आले.