चाकणमध्ये स्पाच्या आड देहव्यापाराचा मोठा पर्दाफाश; पीडित महिलेची सुटका - मुख्य आरोपी फरार...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, चाकण
चाकण परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत पर्दाफाश केला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील ‘7 Star Family Spa’ वर टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे, शेजारीच हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक सेंटर असतानाही हा मानवी तस्करीचा घाणेरडा व्यवसाय खुलेआम सुरू होता, ही बाब अधिक धक्कादायक आहे.
पोलीस कारवाईत ३२ वर्षीय पीडित महिलेची सुटका केली असून आरोपींविरुद्ध BNS आणि PITA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून
मुख्य आरोपी गजानन सूर्यवंशी फरार, असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
या घटनेमुळे चाकण परिसरात खळबळ उडाली असून, “स्पा”च्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर धंद्यांवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.