हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे जोमात, पोलीसांचा धाक कमी...
![हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे जोमात, पोलीसांचा धाक कमी...](https://news15marathi.com/uploads/images/202301/image_750x_63b55b9565153.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : नारायण काळे
हिंगोली : जिल्ह्याचे नवनिर्वाचीत पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारतच.! जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपून घेतले जाणार नाहीत; अवैध व्यवसायिकांना जेलबंद करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला दिले. परंतु, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस प्रशासनाचा धाक आता कमी झाला असून, जिल्ह्यात पुन्हा: एकदा अवैध व्यवसाय जोर धरू लागले आहेत.
याघडीला जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम मटका, गुटखा, जुगार, देशी विदेशी दारु.! त्याचबरोबर गांजा अशा अवैध व्यवसायकांनी डोको वर काढले आहे. जिल्ह्यात अवैध व्यवसाय कोणाच्या आशिर्वादाने चालविले जातात असे आता सामान्य नागरिकाकडून बोलले जातात असून, नागपुर हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदच्या आमदार प्रज्ञा राजीव सातव यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय विरोधात तारांकित प्रश्न विचारुन विधान परिषदेत प्रश्वोत्तर च्या तासात सांगितले.! तरीपण जिल्ह्यातील व्यवसाय हे पोलीसाच्या आशिर्वादाने चालत असल्याचे; नागरिकांमधून बोलले जाते.
जिल्ह्याचे पोलीस आधिक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वाकारताच जिल्ह्यातील अवैधधंद्ये व्यवसाय बंद करुन जे कोणी अवैधधंदे चालवेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. तरी पण जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, औढा नागनाथ, वसमत पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीसाच्या नाकावर टिचुन खुलेआम अवैधधंदे बोकाळले आहेत.