राजकीय : समशेरपूर गटातील नेते फक्त बोलघेवडे, मतदानात मात्र मागे, साहेबांना देवठाण गटाने तारले, वाळेही तितकाचं जबाबदार.!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले : अकोले विधानसभेत डॉ.किरण लहामटे यांना सर्वाधिक धोका देणारा गट ठरला तो म्हणजे समशेरपूर गट आहे. या गटातील नेते फक्त बोलघेवडे ठरले आहेत. त्यांना स्वतःच्या गावात मतदान घेण्यास सपशेल अपयश आले आहे. समशेरपूर गाव मोठी बाजारपेठ आणि मोठे मतदान असलेले गाव म्हणून ओळखले जाते. या गावातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनील दराडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य पोपट दराडे तसेच अगस्ती कारखाना संचालक सचिन दराडे असे तोलामोलाचे नेते या गावात असूनही त्यांना महायुतीचे उमेदवार असलेले डॉ.किरण लहामटे यांना गावातून आघाडी देता आली नाही.
समशेरपूर गावातील हे नेते फक्त भाषणे ठोकणे आणि पुढारपण करणे,पदे मिळाली नाही तर नेतृत्वावर दबाव टाकणे अशी पॉलीसी वापरून पदे घेणे, गावासाठी मागेल ती कामे देऊनही त्यांना गावातून आमदार साहेब यांना आघाडी देता आली नाही म्हणजे यांचे हे राजकीय अपयश म्हणावे लागेल. फक्त भाषणे ठोकून मते मिळवता येत नाहीत तर, त्यासाठी तळागाळापर्यंत पोहचून सर्वसामान्य माणसामध्ये जाव लागत हेच कुठे तरी या पोष पुढाऱ्यांचे चुकले असावे असा अंदाज व्यक्त केला तरी तो चुकीचा ठरायला नको. वरील बोल घेवड्या नेत्यांसाठी ही कानावरून गेलेली निवडणूक आहे. यातून त्यांनी बोध घेऊन पुढील राजकीय प्रवास करायला हवा.
या उलट देवठाण गटात आमदार साहेब यांचे जीवाभावाचे कार्यकर्ते कमी असूनही आणि आमदार साहेबांचे वैयक्तिक लाभार्ती नसलेले फक्त आमदार साहेब जवळचा मित्र म्हणून प्रामाणिक काम करून फक्त एक हिवरगाव आंबरे गाव सोडता सगळ्या देवठाण गटात आमदार साहेब यांना उच्चांकी मताधिक्य मिळाले आहे. त्यात ज्या देवठाण गावात वाळे एजेंट याने विरोधी गटाच्या लोकांना कामे देऊनही त्यानी आमदारांचे कसलेच काम केले नाही. पण त्या गावातील आमदार साहेब यांचा फाटका कार्यकर्ता असलेला जालिंदर बोडके,संचालक सुधीर शेळके, मित्र शिवाजी पाटोळे यांच्यासह गावातील विकासकामांच्या जोरावर स्वतः मतदारानी मोठी आघाडी देवठाण गावातून दिली. त्या उलट उचापती वाळेने ज्या विरोधकांना कामे दिली त्यांनी देवठाण गावातच आमदार ताई यांना इकडे मतदान माघू नका असे सांगितले. म्हणजे यावरून मलिदा खाणारे वेगळे आणि काम करणारे वेगळे असेच काहीसे चित्र तालुक्यात दिसत आहे. हा वाळे सर्व सामान्य आमदार साहेबांच्या फाटक्या कार्यकर्त्यांना कामे न देता कमिशन घेऊन जर पोपट पंची करणाऱ्या आणि सदैव आमदार साहेब यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करणाऱ्या व्यक्तीस १० लाखाची कामे देत असेल तर या वाळेचा साहेबांनी बंदोबस्त करायला हवा. नाहीतर याचा मोठा फटका साहेबाना बसल्याशिवाय राहणार नाही.
या वाळे नामक उचापती बहाद्दर याने ज्या ठेकेदारांना कामे दिलेत त्यातील बऱ्याच ठेकेदारांनी संगमनेर येथे एकत्र येऊन कुणाकुणाला २५-२५ लाख रुपये जमा करून दिले याचीही साहेबांनी माहिती घ्यावी.आता साहेबांनी या वाळेच्या चाळ्यांच्या आहारी न जाता त्याची कानउघडणी करायला हवी.
बर देवठाण गटात विरगाव गावातही भाजपा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांचा वरचष्मा दिसून आला. देवठाण गटाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांनी त्या गटात जीव ओतून काम केल्याने त्या गटात व गावातील स्थानिक नेत्यांच्या जोरावर आमदार डॉ.किरण लहामटे यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. पिंपळगाव निपाणी गावातून राजाराम वाकचौरे, गणोरे गावातून युवा नेता शुभम आंबरे व त्यांचे सहकारी नेते अन कार्यकर्ते, डोंगरगावातून सुनील उगले यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने मोठे मताधिक्य मिळून दिले. त्यामुळे डॉ.किरण लहामटे यांना देवठाण गटातून मिळालेल्या निर्णायक आघाडीमुळे सर्वाधिक वाटा देवठाण गटाचा असल्याचेही दिसून आले आहे.
आमदार साहेब यांनी काही झाल्या गेल्या गोष्ठी सोडून आपण कुठे व कशामुळे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करून जशी मागील पाच वर्षात कामे केली आहेत तशीच यापुढे सुरु ठेवावीत आणि त्यांच्या प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते यांना बळ द्यायला हवे. नाहीतर काम साहेब करणार, गावातील प्रस्थापित विरोधक प्रामाणिक कार्यकर्ते अंगावर घेणार आणि तिकिटे वाटायची किंवा लाभाची पदे किंवा कामाची वेळ आली कि ती कुणाला द्यायची आणि कुणाला नाही द्यायची हे जर बाहेरून आलेला वाळे ठरवणार असेल तर कुठे तरी गणित चुकत असल्याची भावना प्रामाणिक कार्यकर्ते,समर्थक बोलून दाखवत आहेत.
आमदार साहेबांच्या जवळच्या कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली असता त्यांची एकच तक्रार आहे. कि, साहेबांनी आम्हाला एकवेळा कामे देऊ नये. पण,साहेबांनी आम्ही केलेल्या कामासाठी शाबासकी द्यायला हवी आणि जो वाळे आमच्याबद्दल तुमच्या मनात काही तरी भरवून आम्हाला तुमच्या पासून दूर करत असेल तर अशा व्यक्तीचा बंदोबस्त साहेबांनी करायला हवा. नाहीतर आम्ही केलेले साहेबांसाठी काम, निष्ठा, प्रामाणिकपणा याला कोणतेही मोल राहणार नाही अशी उदिघ्न भावना प्रामाणिक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
या उलट कार्यकर्ते असेही बोलतात आम्ही साहेबाना सल्ला देण्याइतपत मोठे नाहीत. पण साहेबांनी निवडणुकी अगोदर जसा मवाळ स्वभाव केला होता तो स्वभाव कुठे तरी निवडणूक झाल्यावर चिडचिडा झाल्याचे दिसून येते. साहेबांनी यावर आवर घालून आपले कार्यकर्ते एक कुटुंबातील सदस्य आहे आणि तो माझ्यासाठी कसलीच अपेक्षा न करता काम करत असेल तर त्याच्याशी आपुलकीने वागायला हवे अशीही भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. यावर आता डॉ. किरण लहामटे हे आपल्या आमदारकीच्या पर्व २.० मध्ये काय सुधारणा आणि काय उपाययोजना करतात हेच पहावे लागेल.