कोरडा दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा मंजूर करा - युवक कॉग्रेसची मागणी...
![कोरडा दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा मंजूर करा - युवक कॉग्रेसची मागणी...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64e75d47037e7.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
चाकुर तालुक्यात सध्या पावसाचा खंड पडल्यामुळे, खरीप पिके शेतात वाळूम जात आहेत. त्यामुळं कोरडा दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना तात्काळ खरीप विमा मंजूर करावा अशी मागणी; भारतीय राष्ट्रीय युवक कॉग्रेस पार्टीच्यावतीने तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
चाकुर तालुक्यात मागील २७ ते २८ दिवसापासून पाऊस झालेला नाही. पावसा अभावी शेतातील पिके वाळून जात आहेत. सद्य परिस्थिती पाहता पिकांचे ५०% जास्त उत्पादन घटलेल आहे. अशा परिस्थितीत सुद्धा सरकार म्हणून सरकारमधील कोणतेही नेते याची दखल घेत नाहीत. तसेच कुठल्याही विमा कंपनी किंवा तहसील यांच्याकडूनही अद्याप पर्यंत कसल्याही प्रकारची मदत होताना दिसत नाही. सध्याची परिस्थिती पाहता आतापर्यंत प्रत्येक गावामधील परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना दिलासा म्हणून, नुकसान भरपाई अनुदान आणि विमा हा मंजूर व्हायलाच पाहिजे पण असं झालं नाही. झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला व प्रशासनाला जाग आणण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल घेऊन जर योग्य ती मदत लवकरात लवकर करण्यात आली नाही; तर युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावेळी निलेश देशमुख, शेख पप्पूभाई, तांबोळी सलीमभाई, शिंदे प्रशांत, भोसले बाळासाहेब, जाधव मोहन, अनारुपे सचिन, भागवत सूर्यवंशी, नितीन सूर्यवंशी, शिवानंद स्वामी, शिवकुमार गादगे, प्रशांत धनशेट्टी, लिंबराज गरड, भरत रेड्डी, ज्ञानेश्वर गोमसाळे, आयनुले नरसिंग, सय्यद गौस, भोसले रामेश्वर, जाधव रविकांत, उजळंबे बळीराम, दिगंबर माळी, खादर धानोरे, रंजीत पाटील, शरद जाधव, बुद्धभूषण पाटोळे, शेख शिराज, शेख अलीम, शेख असिफ, सचिन चाकूरकर, कांबळे आनंद, सोळुंके अरविंद, रोशन शेख, महादेव शिंदे, केशव सोनवणे, बबलू झांबरे आधी युवक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.