उपोषणकर्त्यांनी पंचायत समिती आवारात साजरी केली बाबासाहेबांची जयंती.! कारवाई होत नाही तो पर्यंत उपोषण मागे न घेण्याची शपथ...
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समिती आवारात वंचित बहुजन आघाडी'च्यावतीने; गेल्या सहा दिवसापासून दादाराव खंदारे व धम्मपाल पाईकराव यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे.
तालुक्यातील कान्हेगाव व बऊर ग्रामपंचायत येथील दलित वस्ती निधीमध्ये ग्रामपंचायतीने गैरव्यवहार केल्याचा आरोप करत; संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
परंतु, संबंधित प्रशासन किंवा गटविकास अधिकारी यांनी कोणतीही दखल न घेतल्याने; तसेच 14 एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने; त्यांनी आपले उपोषण चालूच ठेवत.! पंचायत समिती आवारातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून वेगळी जयंती साजरी केली आहे.
तसेच जोपर्यंत संबंधितावर कारवाई होत नाही तोपर्यंत कुपोषण मागे घेणार नसल्याची शपथ यावेळी त्यांनी घेतली आहे.