पाणी हक्क संघर्ष समितीचा; तहसील कार्यालयापासून वाई बायपासपर्यंत मोर्चा...

पाणी हक्क संघर्ष समितीचा; तहसील कार्यालयापासून वाई बायपासपर्यंत मोर्चा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तहसील कार्यालयापासून, वाई बायपासपर्यंत; पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीने दि. ३१ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात आला आहे.  ईसापुर धरणातून शेनोडी व रामवाडी उपसा सिंचन राबविण्याबाबत मोर्चा काढण्यात आला.

उपसा सिंचन हे 2008 पासून प्रस्ताव विचाराधीन आहे. तरीसुद्धा प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन टाळाटाळ करीत आहे. ईसापुर धरणाच्या जलाशयातून तालुक्यातील शेनोडी या गावापासून शेनोडी व रामवाडी ही उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. तरी शासन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी ईसापुर जलाशयातून नांदेड जिल्ह्याला वळविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्याला पाणीपुरवठा केला तर कळमनुरी तालुक्याचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. पाणी हक्क संघर्ष समितीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.