मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची तब्बेत बिकट.! तर त्यांच्या किडनीवर'ही परिणाम?
NEWS15 मराठी रिपोर्ट - जालना
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी; गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आणखीनच खालवली आहे. आंदोलनस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे.
धक्कादायक म्हणजे; उपोषणाचा परिणाम आता त्यांच्या प्रकृतीवर पण होत असून, काही वेळापूर्वी आरोग्य विभागचं एक पथक उपोषणास्थळी दाखल झाले. दरम्यान मनोज जरांगे यांची बीपी कमी झाली आहे. तसेच त्यांच्या किडनीवर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत.
यावेळी बोलतांना डॉक्टर म्हणाले की, मनोज जरांगे यांचे रक्त चाचणी झाली आहे. तर ते पाणी पित नसल्याने युरिन आऊटपूट कमी होत आहे. रक्तात बिली रुबिन प्रमाण वाढत आहे. त्याचे परिणाम किडनीवर होत आहे. त्यामुळे अँटीबायोटिक सुरू केले आहे. सध्या एक सलाईन लावण्यात आले असून, त्यांची प्रकृती पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत. मनात जरांगे यांना काल देखील सलाईन लावण्यात आली होती. तर आज देखील डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.