दारु बंदी झालीच पाहिजे म्हणत; मुंढळ येथील महिलांनी गाठले पोलीस ठाणे...

दारु बंदी झालीच पाहिजे म्हणत; मुंढळ येथील महिलांनी गाठले पोलीस ठाणे...

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

हिंगोलीतील मुंढळ येथील महिलानी गावातील देशी दारु विक्री बंद झालीच पाहिजे  या मागणीसाठी  थेट पोलीस ठाणे गाठत पोलीस प्रशासनाला धारेवर धरत गावातील अवैध देशी दारु बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे अशा घोषना बाजी  करण्यात आल्या .

कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मुंढळ  गावात कितेक दिवसापासून अवैध देशी गावठी दारु विक्री होत आहे यामुळे गावातील तरुण मुले पुरुष व्यसनाच्या आहरी गेले रोजची तिनशे चारशे रुपये आलेली रोज मजुरी दारु मध्येच खर्च करतात रिकाम्या हाताने घरी येऊन घरात भांडणे करतात यामुळे उपासमारीची वेळ येत आहे संसार उध्दवस्थ होत आहे युवक पिढी दारुच्या आहरी गेल्याने त्याचे शिक्षणाकडे लक्ष राहिले नाही.  याकडे पोलीसाकडुन कोणतीही कारवाई होत नसल्याचे यावेळी महिलांनी सांगितले चार दिवसात अवैध दारू बंद झाली नाही तर कळमनुरी पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार अशा इशारा मुंढळ गावातील महिला पुरुषानी दिला.