ऑटो स्टॅंडवर वाढत्या अतिक्रमणा विरोधात ऑटो चालकांचा लाक्षणिक चक्काजाम...

ऑटो स्टॅंडवर वाढत्या अतिक्रमणा विरोधात ऑटो चालकांचा लाक्षणिक  चक्काजाम...

प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी

यवतमाळ जिल्हा - पाटणबोरी येथे ऑटो स्टॅंडवर वाढत्या अतिक्रमणाविरोधात; आज दि. 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ऑटो चालकांनी एकत्र येऊन मुख्य रस्त्यावर ऑटो लावून लक्षणीय चक्काजाम केला.

यावेळी ऑटो चालकांनी ऑटोस्टॅंडवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली.

ऑटो स्टॅंडवर ठेले व टिनाचे शेड पडत असल्याने, ऑटो थांबविण्याकरिता जागा नाही. आम्ही दिवसभर गावात सेवा देतो, ती सेवा कुठून द्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच प्रकारे ठेले पडत राहिल्यास आम्हाला जागा शिल्लक राहणार नाही. अशी एम.एच. लोकल ऑटो चालकांची मागणी होती.

यावेळी पोलीस आऊट पोस्ट पाटणबोरी व ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आले. स्थानिक पोलिसांनी फोनवर संपर्क साधून ऑटो चालकांना रस्ता मोकळा करण्याबाबत सूचना केल्या.