खराबवाडी गावातील मुजोर महिला वायरमन(तंत्रज्ञ) यांची तातडीने बदली करण्याची ग्रामस्थांकडून मागणी…!

खराबवाडी गावातील मुजोर महिला वायरमन(तंत्रज्ञ) यांची तातडीने बदली करण्याची ग्रामस्थांकडून मागणी…!

News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावात मागील बऱ्याच दिवसापासून विजेचा लंपडावं सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यात बऱ्याच वेळी गावातील रोहित्राच्या अडचणीमुळे गावातील लाईट जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. यावर वीज वितरण कंपनीने नेमलेल्या महिला वरिष्ठ तंत्रज्ञ यांना वेळोवेळी सूचना करूनही वरिष्ठाना फोन करा, मला रात्री फोन करू नका अशा प्रकारची उत्तरे मिळतात. एवढेच नाही तर यांच्याकडून औद्योगिक वसाहतीतील कंपन्याकडून मोठी आर्थिक वसुलीही केली जात असल्याचेही निदर्शनात आले आहे. यामुळे या मुजोर महिला तंत्रज्ञ यांची तातडीने उचलबांगडी करण्याची मागणी खराबवाडी गावातील ग्रामस्थांनी केली आहे. यात विशेष बाब म्हणजे या महिला तंत्रज्ञ यांचा कार्यकाळ संपूनही त्यांना कुणाच्या आशीर्वादाने खराबवाडी गावात ठेवल्याची चर्चा आता ग्रामस्थांकडून होत आहे. त्यात खराबवाडी गावाचा अवाका पाहिला तर, या ठिकाणी दोन तंत्रज्ञ यांची गरज आहे. तर या गावात एक सेवा निवृत्त झालेला तंत्रज्ञ काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवा निवृत्तीचे वय पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्या नियमाच्या आधारे वरिष्ठानी कामावर ठेवले हाही एक अनुउत्तरीत प्रश्न आहे.

अनेक वेळा रात्री अपरात्री खराबवाडी गावातील वीज गूल होते त्यावेळी एक महिला म्हणून ग्रामस्थ या महिला तंत्रज्ञ यांना फोन करू शकत नाही. त्यामुळे अनेक वेळा गावातील ग्रामस्थांना अंधारात रात्र घालवावी लागते असाही काहीसा अनुभव गावातील ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे गावासाठी पुरुष वीज तंत्रज्ञ देण्याची मागणी व या महिला मुजोर वीज तंत्रज्ञ यांची तातडीने बदली करण्याची मागणी गावच्या ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. यावर वरिष्ठानी येत्या आठ दिवसात कार्यवाही केली नाही तर खराबवाडी गावातील ग्रामस्थ चाकण वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रतिक्रिया :

मागील काही दिवसापासून गावातील लाईट जात आहे. यावर एकदिवस मी महिला वायरमन यांना फोन केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिले. व मला फोन न करता माझ्या वरिष्ठ अधिकारी यांना फोन करा असे सांगितले. यावर मी लाईट नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद असल्याने माझ्या कुटूंबाला रात्रभर अंधारात काढावे लागले. महिला असल्याने आम्हाला त्यांना रात्री फोन करता येत नाही आणि त्यांची भाषा अतिशय उग्रट असते. त्यामुळे या महिलेची तातडीने बदली करून आम्हाला पूर्णवेळ पुरुष वीज तंत्रज्ञ मिळावा अशी मागणी आहे. जर वरिष्ठानी आमच्या मागणीचा विचार केला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देतो.

  • संतोष खराबी, ग्रामस्थ