कळस बु येथे शासन निर्णयाच्या विरोधात शाळा बंद आंदोलन..
News15 विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा राज्य शासनाने बंद करण्याच्या विरोधात कळस बु ता अकोले येथील अटलबिहारी वाजपेयी आंतराष्ट्रीय शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद ठेऊन सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले. ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यामध्ये सामील झाले होते. जेष्ठ नेते सोन्याबापु वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे नेते सोन्याबापु वाकचौरे यांनी सरकारने कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता हे मंडळ बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य वाटतो आहे. यात काही दोष असेल तर त्यात दुरुस्ती करावी परंतु विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांच्या दृष्टीने हाच अतिशय उपयुक्त असा अभ्यासक्रम होता. अतिशय तज्ञ शिक्षकांनी हा अभ्यासक्रम तयार केला असून उलट संपूर्ण राज्यात ही शिक्षण प्रणाली लागू करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, सरकारने जो निर्णय घेतला आहे या निर्णया संदर्भात सरकार दरबारी हे शिक्षण विद्यार्थ्यांना उपयुक्त कसे आहे हे सांगण्यासाठी पाठपुरावाही करण्यात येईल. यावेळी हभप विष्णू महाराज वाकचौरे, शिक्षण तज्ञ भरत वाकचौरे, जेष्ठ नेते सिताराम वाकचौरे यांची भाषणे झाली. यावेळी सरपंच योगिता वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, शिवसेना नेते रावसाहेब वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, माजी सरपंच कारभारी वाकचौरे, यादव वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, राहुल वाकचौरे, गणेश रेवगडे, दत्तू ढगे, दौलत वाकचौरे, आरपीआय नेते राजेंद्र गवांदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शालेय कमिटीचे अध्यक्ष ईश्वर वाकचौरे, उपाध्यक्षा सरिता भुसारी व सदस्य यांनी अकोले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांना निवेदन दिले. व आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहचविण्याची मागणी केली.