कादवाच्या सर्व रोग निदान शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद...!
![कादवाच्या सर्व रोग निदान शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद...!](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_6570874682418.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण
दिंडोरी : दैनंदिन सुखी जीवनासाठी आरोग्याची निगा राखणे आवश्यक असून त्यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार या सोबतच वेळोवेळी आरोग्य तपासणी करून उपचार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या ७७ व्या वाढदिवस तालुक्यात अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले त्यामुळे हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी शेटे यांची भेट घेऊन साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्ताने कादवा कारखाना व मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाचे मार्फत मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन श्रीराम शेटे, शिवाजी बस्ते, साहेबराव पाटील, जेष्ठ सभासद काशिनाथ जमधडे, विश्वासराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी शेटे बोलत होते.
कादवा सहकारी साखर कारखाना सतत सामाजिक उपक्रम राबवत आलेला आहे. त्याअंतर्गत गरजु नागरिक, जेष्ठ सभासद, ऊसतोड मजूर, कादवा कामगार व सभासदांसाठी कादवा कारखाना येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,माजी आमदार रामदास चारोस्कर, तहसीलदार पंकज पवार, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, मविप्र माजी संचालक दत्तात्रेय पाटील, बाजार समिती सभापती प्रशांत कड, उपसभापती कैलास मवाळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे आदी. मान्यवरांनी भेट दिली. या शिबिरासाठी डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज,आडगावचे डॉ.आशिष शिरोडकर (एम.डी.मेडीसीन), डॉ.शुभम मिसाळ (एम.एस.), डॉ.सुमित सोनी(अस्थी रोगतज्ञ), डॉ.हुस्ना तांबोळी (स्त्रीरोग तज्ञ), डॉ.अंजना प्रियंका (बालरोग तज्ञ), डॉ.सुप्रिया डांगे (नेत्ररोग तज्ञ), डॉ.आशिष तोतावाल (कान नाक घसा तज्ञ), डॉ.स्नेहल कांबळे (त्वचा रोग तज्ञ), डॉ.सबूरी गोलेवार (फिजिओथेरपिस्ट), सहाय्यक डॉक्टर जगदिश मते, डॉ.संकेत मेहरकर, डॉ.मानसी महाजन, डॉ.मयुरेश माने, दिलीप घोटेकर (लॅब टेक्निशियन), निकिता गांगुर्डे (फार्मसिस्ट) नर्सिंग स्टाफ ऋतीका वाघ, सुप्रिया जाधव, चैताली आंबेकर, रोहिणी जाधव, मृणाली वाघ, अंकिता अहिरे, शौर्य आडके,शिबीराचे संयोजक प्रविण वाघ व प्रविण घुमरे, कादवा नर्सिंग कॉलेज व बी.के कावळे विद्यालयाचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सुमारे 400 लाभार्थी यांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबीरामध्ये मोफत इसीजी,रक्तातील साखर व हिमोग्लोबिन तपासणी व मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली. ज्या लाभार्थींना पुढील उपचारासाठी आवश्यकता होती त्यांच्यासाठी डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आडगाव येथे मोफत औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. समारोप प्रसंगी कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, दिनकरराव जाधव,शहाजीदादा सोमवंशी,मधुकर गटकळ,विश्वनाथ देशमुख,दादासाहेब पाटील,बापुराव पडोळ,सुखदेव जाधव,सुभाष शिंदे,अमोल भालेराव,सुनिल केदार,राजेंद्र गांगुर्डे,सौ.शांताबाई पिंगळ सौ.चंद्रकला घडवजे,जयराम उगले,अशोक वडजे,सोमनाथ मुळाणे, साहेबराव कंक्राळे,गंगाधर निखाडे,भगवान जाधव,कार्यकारी संचालक विजय खालकर,सचिव राहुल उगले, प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले,आर्थिक सल्लागार जगन्नाथ शिंदे, उपमुख्य लेखापाल सत्यजीत गटकळ,अधिकारी वर्गातील मच्छिंद्र शिरसाठ,गणेश आवारी,शरदचंद्र चव्हाणके,अर्जून सोनवणे,अरुण सुर्यवंशी, किरण शहाणे,गणेश मार्कंड,प्रताप सावंत,मोहन फलाणे,बापु शिंदे, युनियन सरचिटणीस अजित दवंगे व सर्व पदाधिकारी,माजी कार्यलक्षी संचालक सुनिल कावळे व संतोष मातेरे यांच्या शुभहस्ते शिबिरातील मेडिकल कॉलेजच्या डॉ. व सहकार्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कादवाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप तिडके यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.