सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्याकडून गरजूंना फराळ वाटप
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार बापू चव्हाण यांनी एक करंजी मोलाची या उपक्रमांतर्गत दिवाळीच्या आनंदामध्ये समाजातील दीनदुबळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी हा अभिनव उपक्रम दरवर्षी चव्हाण राबवत असतात.
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा हा सण सर्वांना साजरा करता यावा व गोरगरीब गरजूंना त्यांची दिवाळी गोड कशी होईल आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेपोटी हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून ते गोरगरीब गरजूंना दिवाळीचे फराळ वाटप करत असतात.त्यांच्या या उपक्रमाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.