टेंभुर्णी येथे समशानभूमी नसल्याने मतदानावर बहिष्कार

टेंभुर्णी येथे समशानभूमी नसल्याने मतदानावर बहिष्कार

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपुर तालुक्यातील टेंभुर्णी गावात अनेक वर्षापासून सार्वजनिक समशानभूमीची व्यवस्था नसल्याने काय निवडणुकीच्या तोंडावर गावकऱ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेऊन मतदानावर बहिष्कार घातला आहे.

याबाबत तालुका निवडणूक अधिकारी यांना लेखी निवेदन दिली आहे की, टेंभुर्णी गावात अनेक वर्षापासून सार्वजनिक समशानभूमीची व्यवस्था नसल्याने गावात मयताच्या नातेवाईकाची तारांबळ होत असून.! इ .स .२००० मध्ये गावचे पुनर्वसन झाले. स्मशान भूमीसाठी गट क्र . ११९ व १२० जागा संपादित केली होती. परंतु मूळ मालकाने खोट्या कागदपत्राच्या आधारे गावठाणची समशान भूमीची जागा संपादन प्रक्रियेतून वगळली आहे. त्यामुळे गावातील मृत्यू देहाचे दहन नागरिक सोयीप्रमाणे करीत आलेले आहेत. याबाबत शासनाला तोंडी व लेखी निवेदन उपोषण हि करून सुद्धा आज तागायत स्मशानभूमीला जागा उपलब्ध होऊ शकली नाही म्हणून, गावकऱ्यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकीत असल्याचे निवेदन तालुका निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कार्यालय अहमदपूर यांना दि १८.१०.२०२४ रोजी दिले आहे. या निवेदनावर गावातील ७९ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.