5 मार्च रोजी लोदग्याचे सरपंच करणार आत्मदहन? प्रशासनाला जाग येईल का...

5 मार्च रोजी लोदग्याचे सरपंच करणार आत्मदहन? प्रशासनाला जाग येईल का...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लोदगा येथील सरपंच पांडूरंग रामचंद्र गोमारे यांनी दि.१.१.२०२४ रोजी लेखी निवेदन कार्यकारी अभियंता संभाजीनगर यांना दिले की, लातूर - निटूर मोड ते शाहजणी औराद हायवे रस्ता निकृष्ट दर्जाचा होत आहे. असे कळवून उपोषण केले. मात्र लेखी अश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. परंतू या कामाची दखल घेतली नाही म्हणून दि १.१.२०२४ रोजी आत्मदहन करण्याचा निवेदन दिल्यामुळे जिल्हा दंडाधिकारी लातूर यांनी कार्यकारी अभियंता यांना कार्यवाही करण्याची लेख पत्र दिले आहे.

तसेच हे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत हे काम त्वरीत करावे अन्यथा दि ५.१.२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.