रात्रीस खेळ चाले.! बंद असलेली रेती उपसा कुणाचे आशिर्वादाने सुरू...

रात्रीस खेळ चाले.! बंद असलेली रेती उपसा कुणाचे आशिर्वादाने सुरू...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया

सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, फुटाळा शेतशिवारातून वाहत असलेल्या चुलबंद नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची चोरी सर्रास सुरू आहे. दररोज रात्री ११ ते पहाटे ४ वाजेदरम्यान नदीपात्रातील रेतीचा जेसीबी मशीने उपसा करून, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू आहे.

चुलबंद नदीपात्रातील नंदीपिंडी घाटातील रेती उत्खनन करून एका ठिकाणी जमा करून ट्रॅक्टरद्वारे बांधकामासाठी अवाढव्य भावाने विक्री केली जात आहे. सदर रेती साकोली, कोसमतोंडी, पांढरी,सातलवाडा, मुंडीपार (ई) या परिसरात पहाटे दरम्यान आणली जात आहे. या रेतीची विक्री २०-२५ हजार रूपये टिप्पर मागे घेवून खुलेआम सुरू आहे. मात्र याकडे महसुल विभागाचे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बंद असलेल्या घाटावरून रेतीचा उपसा कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे असाही प्रश्न करीत आहेत.

मागिल दिवाळी पासून सदर रेती घाट बंद असून, या घाटावरून रेतीचा उपसा कसा सुरू झाला असे सौंदड, फुटाळा येथील नागरिकांत चर्चा आहे. काही रेती तस्करांनी अधिका-यांवर पाळत ठेवण्यासाठी डुग्गीपार पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व कोहमारा ते सौंदड महामार्गाला मिळणा-या रस्त्याच्या फाट्यावर येणा-या अधिका-यांची माहीती देण्यासाठी आपले गुप्तहेर बसवून ठेवले आहेत. जेणेकरुन रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर, टिप्पर पकडला जाणार नाही. काही रेती तस्करांनी तलाठी व पोलीस कर्मचा-यांना हाताशी धरून रेतीचा चोरटा व्यवसाय सुरू केला आहे‌. रेती तस्कर खाजगीत सांगतात की, रेती व्यवसाय अधिका-यांना हाताशी धरून केला जातो. या ३-४ दिवसात  हजारो ब्रास रेती मोक्यावरून  उपसा करण्यात आली आहे. हे प्रत्यक्षदर्शनी मोक्यावरी खदानी पाहून लक्षात येते. रेती घाटावरून रेती चोरी जाणार नाही म्हणून घाटावर जाणा-या रस्त्यावर मोठमोठ्या नाल्या असून त्या नाल्या रेती उपसा करण्यासाठी जेसीबीने बुजविल्या जाते. आणि रेती घाटावरून बाहेर काढल्यानंतर पूर्ववत नाली खोदून ठेवली जाते. रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर सौंदड, फुटाळा गावातून सुसाट वेगानेहचालवित असल्याने रोडाजवळील लोकांची झोप मोड होते. तसेच रस्त्याचे धुरामुळे रोडाजवळील घरांवर धुळीचे थरचे थर जमा होतात. तसेच रस्त्याची दयनीय अवस्था होत आहे. चुलबंद नदीपात्रातील नंदीपिंडी घाटातून सर्रासपणे रेतीचा उपसा साहेब कुणाचे आशिर्वादाने सुरू आहे असा प्रश्न केला जात आहे.