म्हेळुस्के गावावर शोककळा.! अपघातात एकाचा मृत्यू...

म्हेळुस्के गावावर शोककळा.! अपघातात एकाचा मृत्यू...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथील एकाचा अपघातात मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हेळूस्के येथील शांताराम किसन गांगुर्डे (वय ४५) हे वनीखुर्द येथे एका लग्न समारंभासाठी गेले असता; तिकडून घरी परत येत असताना अचानक एका खड्ड्यात गाडीसह पडल्याने ते जबर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून शांताराम गांगुर्डे यांना मृत घोषित केले.

त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेस गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.