खड्ड्यांमुळे अपघात वाढले; प्रशासनाची वाट न पाहता नगरसेवकाने स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला
प्रतिनिधी विश्वनाथ केसवड खेड,
राजगुरूनगर : राजगुरूनगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक तीनमधील वाफगाव रोड परिसरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खड्ड्यांमुळे याठिकाणी अनेक अपघातही घडले असून, विशेषतः महिला दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले होते.
रस्त्याची दुरवस्था पाहून प्रशासनाकडून काम होण्याची वाट न पाहता नगरसेवक दिनेशभाऊ सांडभोर यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवून रस्त्याचे काँक्रिटीकरण करून घेतले.
वाफगाव मुख्य कॉर्नर, आशानंद कॉर्नर तसेच गणपती मंदिर परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे काँक्रिटीकरण करून बुजविण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी नगरसेवक दिनेशभाऊ सांडभोर, नगरसेविका स्नेहलताई राक्षे, माजी उपसरपंच मच्छिंद्रशेठ राक्षे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक तीनचा सर्वांगीण विकास करून आगामी काळात हा प्रभाग ‘स्मार्ट प्रभाग’ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नगरसेवक दिनेशभाऊ सांडभोर आणि नगरसेविका स्नेहलताई मच्छिंद्रशेठ राक्षे यांनी सांगितले.
दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन स्वखर्चाने दुरुस्ती करण्यात आल्याने नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले.
vishwanathkeswad