मावळ लोकसभेत वंचित'ची एंट्री.! वंचित बहुजन आघाडीकडून माधवी जोशी यांनी भरला उमेदवारी अर्ज...

मावळ लोकसभेत वंचित'ची एंट्री.! वंचित बहुजन आघाडीकडून माधवी जोशी यांनी भरला उमेदवारी अर्ज...

NEWS15 मराठी - PCMC (पुणे)

मावळ लोकसभेसाठी याआधी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे आणि महाविकास आघाडीकडून संजोग वाघिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोघांमध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचे म्हंटले जात असतानाच; आता मावळच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने'ही आपली एंट्री केली आहे. त्यामुळं आता ही निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित माणले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी; पक्षाच्यावतीने आपला अधिकृत अर्ज दाखल केला आहे.

यावेळी बोलताना माधवी जोशी म्हणाल्या की, बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे.! त्या विश्वासाला पात्र ठरेल. या माध्यमातून मलाही संधी मिळाली त्या संधीचे मी सोने करेल असा विश्वास मावळ लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधवी जोशी यांनी व्यक्त केला.

मात्र यावेळी पिंपरी चिंचवड मधील काही पदाधिकारी कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत आहे. माधवी जोशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, पिंपरी चौक ते निवडणूक निर्णय अधिकारी आकुर्डी पर्यंत; रॅली काढून अर्ज भरला.