देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर जोरदार प्रहार.! मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनीच केला - DCM फडणवीस

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर जोरदार प्रहार.! मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनीच केला - DCM फडणवीस

NEWS15 मराठी प्रतिनिधी - मुंबई

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्दा चांगलाच तापला असून, राज्यकर्ते आणि विरोधक.! ह्याच खापर एकमेकांवर फोडत आहेत. तर यातच आता मराठा आरक्षण बाबत एक मोठा आणि खळबळजनक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर फडणविसांच्या ह्या व्यक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात नवा वाद होण्याची दाट शक्यता आहे.

मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध हा शरद पवार यांनी केला आहे. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं बोलणाऱ्या सुप्रिया ताई, त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं होत. उद्धव ठाकरे जेव्हा आरक्षणाविषयी बोलतात. आपण उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले, मात्र त्यांचं सरकार आलं आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षण गेलं. मंडल आयोगाला विरोध करणारे उद्धव ठाकरे होते. भुजबळ का बाहेर पडले होते? कारण त्यावेळी तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता. असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आरक्षणाबाबत आपली भूमिका पक्की आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून आम्ही देणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. ही आमची कमिटमेंट आहे. कार्यकर्त्यांमध्ये जातीचे गट तयार होऊ देऊ नका. ओबीसी व मराठा समाजाच्या मनात तेवढीच कमिटमेंट हवी. मराठा समाजाला आम्ही न्याय देणार आहोत, पण ओबीसीवर अन्याय होऊ द्यायचा नाही, असं आश्वासन देताना विभाजनाचं लोण पसरू देऊ नका, असं आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.