लोखंडेवाडी सोसायटी अध्यक्षपदी गंगाधर लोखंडे यांची बिनविरोध निवड...
![लोखंडेवाडी सोसायटी अध्यक्षपदी गंगाधर लोखंडे यांची बिनविरोध निवड...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66b38cef2c50e.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी गंगाधर लोखंडे तर उपाध्यक्षपदी सुरेश लोखंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश ओहोळ यांनी काम पाहिले.
सुरेश ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उपनिबंधक कार्यालयात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत गंगाधर लोखंडे व सुरेश लोखंडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी संचालक शांताराम वाघ, चेतन उगले, विक्रांत दिवटे, सुनील दिवटे, दशरथ उगले, रमेश वाटाणे, लिलाबाई उगले, रंभाबाई तडाखे आदी उपस्थित होते.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सभासद व ग्रामस्थांनी प्रयत्न केले संचालक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी संचालक चेतन उगले म्हणाले की लोखंडेवाडी गावची अर्थवाहिनी म्हणून या विकास सोसायटी निवडणूक सभासदांनी बिनविरोध करून सोसायटीचा व गावाचा विकास करणे हा या संचालक मंडळाचा विचार आहे.