चाकण शहरात झालेल्या खासदार यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पाठ...!

चाकण शहरात झालेल्या खासदार यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पाठ...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी विकास कामांचा आढावा घेण्यासाठी चाकण नगरपरिषदमध्ये एक आढावा बैठक आयोजित केली होती. या आढावा बैठकीला कायमच महाविकास आघाडीत गृहीत धरणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी यांनी पाठ फिरवल्याने चाकण शहरात चर्चेला पेव फुटले आहे.

चाकण नगररिषदेत आयोजित बैठकीला चाकण शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बरेच पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून येत होते. त्यात प्रामुख्याने चाकण शहराचे माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे व महत्वाचे पदाधिकारी यांनी या बैठकिला न येणेच पसंद केले.

या संदर्भात माहिती घेतली असता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांनी सांगितले की, फक्त महाविकास आघाडी म्हणून डंका पेटवायचा मात्र प्रत्येक्षात मात्र कोणत्याही बैठकीला, कार्यक्रमाला जाणून बुजून आम्हाला डावलायचे असा आमचा अपमान होण्यापेक्षा त्या बैठकीलाच जाणे नको अशी जाहीर नाराजी पदाधिकारी यांनी बोलून दाखवली. जर आमच्या कार्याची आणि विकास कामांची विद्यमान लोकप्रतिनिधी यांना गरज नसेल तर आमचीही भूमिका आम्ही न उपस्थित राहून स्पष्ट केली आहे. उद्या त्यांनीही आम्हाला गृहीत धरू नये अशी उद्दीन प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी यांनी बोलून दाखवली.

सध्या प्रस्थापित सत्ताधारी पक्षांच्या विरोधात महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते एकत्र मोट बांधत आहेत. आणि त्यांचेच लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर जर असे महाविकास आघाडी पदाधिकारी यांना गृहीत धरत नसतील तर महाविकास आघाडीला राज्यात मोठे आव्हानाचा डोंगर उभा राहिल्या शिवाय राहणार नाही. चाकण शहरात उद्धव ठाकरे यांच्या गटाचे पदाधिकारी पक्षाच्या वाईट काळात जीव झोकून काम करत आहेत. त्यात माजी नगराध्यक्ष राहिलेले शेखर घोगरे यांनी सर्व समावेशक भूमिका घेऊन विकासात्मक कामे केली. त्यातून सर्व घटकातील नागरिकांना एकत्र करून पक्ष संघटना चाकण शहरात अबाधित ठेवली. पण ज्या महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्यांनी महाविकास आघाडी म्हणून पदाधिकारी यांना ताकत दयायला हवी ती दिली जात नसल्याची उघड नाराजी पदाधिकारी यांनी बोलून दाखवली. या नाराजीचा लोकप्रतिनिधी सकारात्मक विचारलं करणार की? कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना असेच वाऱ्यावर सोडणार हेच पहावे लागेल.