चिंचखेडला बिबट्याच्या हल्ल्यात 3 बोकड ठार...

चिंचखेडला बिबट्याच्या हल्ल्यात 3 बोकड ठार...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हान, नाशिक 

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे गेल्या कित्येक दिवसापासून बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत सुरू असून, आज गुरुवार दि.१ रोजी पहाटेच्या सुमारास चिंचखेड येथील शेतकरी शशिकांत फुगट यांच्या घराजवळील असलेल्या १ शेळी आणि ३ बोकडवर बिबट्याने हल्ला करत फस्त केले आहे. घराला मोठे तार कंपाउंड असताना देखील त्यावरून उडी घेत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला.

दोन ते तीन दिवसांपूर्वी देखील त्याच ठिकाणावरून बिबट्याने एक बोकड फस्त केले होते. दरम्यान या घटनेने परिसरात तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने त्वरित उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला.