पाटणबोरी येथील मुख्य रस्त्यावरील दुकानांना आग, आगीत दुकान जळून खाक

पाटणबोरी येथील मुख्य रस्त्यावरील दुकानांना आग, आगीत दुकान जळून खाक

NEWS15 मराठी - प्रतिनिधी गजू कैलासवार, यवतमाळ

पाटणबोरी येथील  मुख्य रस्त्यावर असणाऱ्या नालमवार कॉम्प्लेक्स मध्ये रात्री 9 च्या सुमारास कुंदन रुणवाल आदिलाबाद यांच्या जयश्री ज्वेलर्सला अचानक आग लागल्याने, या अग्नितांडवात दुकान जळून खाक झाले आहे.

आगीच्या भडक्याने दुकानाचे शटर खाली आदळले. त्याचवेळी गावकऱ्यांच्या लक्षात येताच पाण्याच्या मदतीने. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.