वलखेड फाटा येथे तिहेरी अपघात.! प्राध्यापक जागीच ठार तर १ जखमी...
![वलखेड फाटा येथे तिहेरी अपघात.! प्राध्यापक जागीच ठार तर १ जखमी...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_644651f053792.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक / दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथे आज अल्टो कार, पिकअप गाडी आणि मोटरसायकलचा तिहेरी अपघात होऊन; या अपघातात प्राध्यापक रामदास माधव शिंदे (रवळस ता. निफाड) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
वलखेड फाटा येथे सोमवार (दि.२४) सकाळी ८:३० वा. नाशिक येथून वणी येथे जाणारी अल्टोकार MH15CM4474 यातील प्राध्यापक रामदास माधव शिंदे वनी येथील ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत होते. ते नाशिक येथून वनी येथे आपल्या अल्टो गाडीने जात असताना; वणीहून दिंडोरी कडे जाणारी पिकअप गाडी MH15EG5830 सागर भास्कर पेलमहाले (आवनखेड) यांची जोराची धडक होऊन, पाठीमागून येणारी मोटरसायकल स्प्लेंडर प्रो MH15 DH4931 विठ्ठल पंढरीनाथ पागे (आंबेवणी) हे त्यात धडकले; (असा तिहेरी अपघात झाला). अपघातात प्राध्यापक रामदास शिंदे हे जागीच ठार झाले aअसून, त्यांचा उद्या मंगळवार (दि.२५) रोजी वणी येथे सेवापूर्तीचा कार्यक्रम होता. त्यात त्यांच्यावर असा काळाने घाला घातलामुळे सर्व शिक्षक वर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर मोटरसायकल वरील विठ्ठल पागे हे अपघातात जखमी झाले आहे.
वलखेड फाटा येथे टाकण्यात आलेले स्पीड बेकर हे (फायबर) निकृष्ट टाकल्यामुळे, ते लवकर खराब होऊन उखडले गेले. येथील स्पीड बेकर हे चांगल्या प्रकारचे टाकण्यात यावे व थोडे दिंडोरी बाजूला पाठीमागे घेण्यात यावे; कारण ते लवकर जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे येथे त्वरित चांगल्या प्रतीचे स्पीड ब्रेकर टाकावे अशी मागणी.! वलखेड येथील ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. सदर अपघाताबाबत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टी. बी. जाधव, पोलीस नाईक एस. के. कडाळे हे अधिक तपास करत आहे.