अक्राळे फाटा येथे बस व कारचा अपघात.! वाहनांनी घेतला पेट, दोघांचा मृत्यू...
![अक्राळे फाटा येथे बस व कारचा अपघात.! वाहनांनी घेतला पेट, दोघांचा मृत्यू...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66af8de1a4072.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे फाट्याजवळ बस आणि बलेनोकार या दोन वाहनांचा आज दुपारी समोरासमोर अपघात होऊन बसणे पेठ घेतल्याची घटना घडली आहे या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे की, बलेनो कार ही नाशिककडे येत होती तर बस कळवण कडे जात होती. यावेळी अक्राळे फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला. त्यामध्ये बसणे पेट घेतल्याने बलेनो कार मधील दोघांचा मृत्यू झाला. तर बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले बसवाला बेलोन कारला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात असूनही बस कळवण आगराची असल्याचे समजते.