पहिल्या पावसातच कमालवाडी येथे ओढ्याच्या पाण्यात महिला गेली वाहून...

पहिल्या पावसातच कमालवाडी येथे ओढ्याच्या पाण्यात महिला गेली वाहून...

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, देवणी (लातूर )

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील कमालवाडी येथे  झालेल्या जोरदार पावसामुळे ओढ्या - नाल्यांना पुर आले आहेत. तर या पुरात शेतातून घराकडे निघालेल्या एका महिलेला पाण्याचा अंदाज न आल्याने; अरुंद ओढ्यात २७ वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत महिलेचा शोध लागला नव्हता.

कमालवाडी येथील सावित्रा दत्तात्रय फडके ही दिवसभर शेतातील काम आटोपून सायंकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना ओढ्याला पूर आला होता. या ओढ्यातून जात असताना तोल गेला आणि ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तिच्यासोबत पती व इतर दोन नातेवाईकही होते. घटना घडून तीन ते चार तास उलटल्यानंतरही प्रशासनाकडून कोणीही पोहोचले नसल्याचे सांगण्यात येत होते.