पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळंदीफाटा ते चिंबळी फाटा येथे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त...!

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळंदीफाटा ते चिंबळी फाटा येथे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त...!

News15 मराठी प्रतिंनिधी सुनील बटवाल

चाकण(चिंबळी): पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळंदीफाटा ते चिंबळी फाटा येथे वाहतूक पोलीस यंत्रणा असुनही वाहतूक कोंडी मात्र कमी होईना. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चिंबळीफाटा येथे चाकण वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक पोलीस यंत्रणा सुरू केली आहे. परंतु कुरुळी, चिंबळी परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र वाढल्याने या परिसरात छोट्या मोठ्या कंपन्या व गोडाऊन उभारली गेले असल्याने जड मालवाहूची वर्दळ वाढली असल्याने चिंबळी, कुरुळी, मोई फाटा येथे नेहमीच वाहतूक कोंडी वाढत असल्याने चिंबळी फाटा येथे रस्ता ओलांडताना व दुचाकी वाहने चालविणे मोठे कसरतीचे झाले आहे. त्यामुळे चिंबळी फाटा येथे सिग्नल बसविण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. ‌