BIG BREAKING : आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते यांच्या गाडीने दोन तरुणांना चिरडले...!

BIG BREAKING : आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते यांच्या गाडीने दोन तरुणांना चिरडले...!

News15 मराठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड 

खेड(राजगुरूनगर): आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर मोहिते यांनी पुणे-नाशिक महामार्गावर दोन तरुणांना स्वतःच्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड -आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते याने विरुद्ध दिशेने बेदरकारपणे गाडी चालवून दोन दुचाकी स्वराना जबर धडक दिली. त्यात ओम सुनिल भालेराव(वय-१९ वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात रविवारी मध्यरात्री पुणे-नाशिक महामार्गवर झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघात घडल्यानंतर अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्या नंतर मंचर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मयूर मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातावेळी मयूर मोहिते स्वतः गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास मंचर पोलीस करत आहेत.