निळवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार.! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...
![निळवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार.! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_656fe78ce7301.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचे वास्तव वाढत असल्याने; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच काल दिवसाढवळ्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे.
गेल्या वर्षापासून सतत पाळीव प्राणी, पाळीव जनावरे यांच्यावर हल्ला करून काहींना ठार केले आहे. तर काही जखमी केले आहे. गेल्या मागील वर्षी एका शाळकरी मुलावर अचानक हल्ला करून ठार केले होते.त्यानंतर ऐन दिवाळीत ओट्यावर पणती लावत असताना एका आठ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. त्यानंतर मेंढ्या, शेळ्या, कुत्रे, जनावरे यांच्यावर हल्ला करून ठार केले आहे. ही घटना ताजी असतानाच काल बाळू चारोस्कर हे दुपारी १२ वाटेच्या दरम्यान नदीकिनारी शेळ्या चारत असतांनाच अचानक बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून लांब ओढत नेवून ठार केले आहे. त्यामुळे शेतकरी, पशु पालक, नागरीक त्रस्त झाले आहेत. शालेय विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी मनात भिंती ठेवूनच शाळेत ये जा करावी लागत आहे. काही विद्यार्थी तर शाळेत सुद्धा जात नाही. तसेच मजूर वर्गही शेतकऱ्यांकडे शेतीकामासाठी धजावत नाही. तसेच शेतकरी सुद्धा जीव मुठीत घेवून शेताकडे जात आहे.
तसेच पूर्व भागातही या बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गेल्या दोन दिवसांपूर्वी पालखेड येथील शेतमजूर मंगेश गोतरणे यांच्या दोन शेळ्या व एक बोकड तसेच वरवंडी येथील एका शेतकऱ्याच्या गाईवर हल्ला करून ठार केले. हे असे किती दिवस चालणार पाळलेले जनावरे यांना हे बिबटे भक्ष करीत असून, आतातर ते मानववस्तीकडेही येत असल्याने नागरिकांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. संबंधित विभागाकडून पंचनामा केला जातो; मात्र नुसकनग्रस्तंना ही मदत तोडकी मिळते याशिवाय ती मदत तात्काळ मिळत नसल्याने, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच विज महावितरण कंपनीकडून रात्री वीज पुरवठा खंडित केला हा पुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करावा जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवसा शेतीपिकांना पाणी देता येईल. यापूर्वी वनविभागाने बंदोबस्तासाठी निळवंडी, पालखेड या ठिकाणी पिंजरे लावले मात्र या पिंजरामध्ये आतापर्यंत फक्त एक बिबट्या जेरबंद झाला आहे. अजून या परिसरात बिबट्या असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसेदिवस बिबट्यांची संख्या वाढत असून मात्र संबंधित विभागाकडे वनक्षेत्र पाल वनरक्षक कर्मचारी यांची संख्या नगण्य असल्याने ही संख्या वाढवण्याची गरज आहे. हे बिबटे अजून किती प्राण्यांचा व नागरिकांचा बळी घेतील हे मात्र सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने यावर काहीतरी उपाययोजना करुन या बिबट्याच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी,नागरीकांनी केली आहे.