यशवंतरावांनी रचला आधुनिक महाराष्ट्राचा भक्कम पाया - डॉ.पाटील

यशवंतरावांनी रचला आधुनिक महाराष्ट्राचा भक्कम पाया - डॉ.पाटील

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

अखिल भारतीय अनिस तर्फे दि.१९ रोजी व्याख्यान मालेत शेती, जलसंधारण शिक्षण, सहकार आणि औद्योगीकरण यासह विविध शासकीय योजनांची उभारणी आणि कायदेयाद्वारे महाराष्ट्र राज्याला सर्वात पुढे घेऊन जाण्याचे श्रेय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि खंबीर नेते यशवंतराव चव्हाण यांना जाते.! असे प्रतिपादन मविप्र ओझर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.नारायण पाटील यांनी केले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवा शाखा यांचे तर्फे दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या समग्र जागृतीव्याख्यानमालेचे पंधरावे पुष्प गुंफतांना "यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र" या विषयावर व्याख्यान देताना डॉ. पाटील बोलत होते.

अध्यक्षस्थानी समितीचे वर्धा येथील राज्य सचिव पंकज वंजारे होते. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात प्रा. नारायण पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा वेध घेत; १९६२ यावर्षी भारतावर चीनने आक्रमण केले तेव्हा पंतप्रधानांच्या आज्ञेवरून यशवंतरावांनी केंद्रात संरक्षणमंत्री पद स्वीकारले आणि आपल्या मुत्सद्दी खंबीर नेतृत्वाने चीनचे आक्रमण परतावून लावले तेव्हा संपूर्ण देशात हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशी ऊक्ती प्रचलित झाली होती हे पटवून दिले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. पंकज वंजारी यांनी आजच्या राजकारणातील नीती मूल्यांची घसरण ही चिंताजनक बाब असून, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचार कार्याचा वारसा जपावा असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक करताना नसीर पठाण यांनी समितीतर्फे राबविले जाणारे उपक्रम आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक श्याम मानव यांच्या कामकाजाची माहिती दिली. राज्य सचिव हर्षाली लोहकरे यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन तेजस्विनी शिरसागर यांनी केले. तर आभार आयुष इंगोले यांनी मानले.

याप्रसंगी मयूर आंबेकर नाशिक सह राज्याच्या विविध जिल्ह्यातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक राजकीय तसेच प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.