संधान यांच्याकडून चिंचखेड विद्यालयात वजन काटा भेट...

संधान यांच्याकडून चिंचखेड विद्यालयात वजन काटा भेट...

प्रतिनिधी -  बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील एल जी पाटील विद्यालयास सामाजिक कार्यकर्ते व सोसायटीचे संचालक शिवानंद रमेश संधान यांच्याकडून शालेय पोषण आहाराच्या धान्याचे मोजमाप करण्यासाठी १०० किलोचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा, ३० वॅटचे २ हाय मास्ट लॅम्प, स्वखर्चाने हा तसेच विद्यालयाच्या दहावीच्या वर्गात व शालेय परिसरात ५ सीसीटीव्ही कॅमेरे व ८ कॅमेऱ्यांचे युनिट बॉक्स,विद्यालयाचे शिक्षक नागरे व शिवानंद संधान या दोघांनी   संयुक्त खर्च करून बसविण्यात आले.

याप्रसंगी निफाड तालुका एज्युकेशन संस्थेचे संचालक बी.आर. पाटील,स्वीकृत संचालक पंढरीनाथ संधान,शालेय समिती सदस्य निवृत्ती पाटील,रामराव पाटील,सुधीर पाटील, बापू पाटील,रवींद्र तिडके,कादवाचे संचालक दादासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील,केशवराव पाटील, गोपेगावचे सरपंच वसंत कावळे, योगेश मधने,त्रंबकराव पाटील, माधवराव पाटील, माणिकराव पाटील, आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती जाधव यांनी शिवानंद संस्थान यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.याप्रसंगी विद्यालयाचे देशमाने, पवार,सौंदाणे,ढोकरे,श्रीमती खोडे श्रीमती चव्हाण,सारंग जाधव,भगवान वाघ,आदींसह शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.