तळेगांव दिंडोरी ते इंदोरे रस्त्याची लागली वाट शेतकऱ्यांमध्ये संताप...

तळेगांव दिंडोरी ते इंदोरे रस्त्याची लागली वाट शेतकऱ्यांमध्ये संताप...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक 

तळेगांव दिंडोरी ते इंदोरे शिव रस्त्यापर्यंत रस्त्यावर खूप मोठया प्रमाणात खड्डे पडले असून शेतकरी व नागरिक तसेच शाळेत येणारे विद्यार्थी यांचे हतोनात हाल होत असून पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांचा गाडी चालवताना अंदाज चुकत आहे.या रस्त्याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही दखल घेतली जात नसून परस्पर या रस्त्याचा निधी काम न करता बांधकाम विभागाने कुठे नेला आहे असा सवाल संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

या रस्त्याने मोठ मोठ्या कंपनीमध्ये जाणारे वाहने व शेतकरी आपली वाहतूक करत आहे.हंगामी काळात च शेतकऱ्यांची पिके असतात व त्याची वाहतूक या रस्त्याने नाशिक कडे होत असते.परिसरातील शेकडो विद्यार्थी ही या रस्त्याने पायी व सायकलने प्रवास करत असतात.या रस्त्यावर एवढी मोठे खड्डे झालेले आहेत की त्या खड्यात भात लागवड करावी लागेल असाही इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

या रस्त्याचे काम व खड्डे न भुजविल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे परिसरातील शेकडो शेतकरी यांनी लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग यांना इशारा दिला आहे.