क्लब ऑफिसर म्हणून जे.एम. कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची निवड...

क्लब ऑफिसर म्हणून जे.एम. कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची निवड...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

नुकत्याच नागपूर येथे झालेल्या कार्यशाळेत जे.एम. पटेल कॉलेजच्या संगणक शास्त्र विभागातील चार विद्यार्थ्यांचा जगप्रसिद्ध क्वीक हिल फाउंडेशन तर्फे क्लब ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली. कश्यप देशपांडे यांचे प्रेसिडेंट, श्रुती चावके हिचे सेक्रेटरी, शुभम खरवडे याचे कम्युनिटी डायरेक्टर, तर प्रिया जंगले हिचे मीडिया डायरेक्टर म्हणून निवड झाली आहे. या कार्यशाळेमध्ये क्विक हिल फाउंडेशन तर्फे सौ.सुगंधा दाणी यांनी मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबरोबर ऑनलाइन जीवनात सायबर अपराधांच्याही संख्येत वाढ होत आहे. आणि त्यासाठीच जे.एम. पटेल च्या चार विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली. या चार क्लब ऑफिसर च्या नेतृत्वात निवडक सायबर पुढील दोन महिने भंडारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच समाजातील विविध घटकांना सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणार आहेत.

या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून, मागील दोन्ही वर्षात या उपक्रमात महाविद्यालयाने विविध पुरस्कार पटकावले आहेत. मागील वर्षी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्विक हिल फाउंडेशन पुणे आणि जे.एम. पटेल महाविद्यालय या दोन संस्थांमध्ये शिका व कमवा या उपक्रमांतर्गत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे आणि क्विक हिल फाउंडेशनचे अजय शिर्के यांनी स्वाक्षरी केली.

या उपक्रमाचा उद्देश शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना सामाजिक जागरूकतेमध्ये सक्षमपणे सहभागी करून घेणे आहे. या करारा अंतर्गत चालणारे या योजनेमध्ये जे.एम. पटेल चे विद्यार्थी विविध शाळा, महाविद्यालयात तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन समाजातील सर्व घटकांमध्ये सायबर जागृतीचे काम करणार आहेत. दोन्ही संस्था या योजनेच्या यशस्वीतेसाठी वचनबद्ध असणार आहेत. उपक्रमासाठी शिक्षक समन्वयक म्हणून संगणक शास्त्र विभाग प्रमुख  डॉ. प्रवीण घोसेकर तसेच संगणक शास्त्र विभागातील डॉ. सबाह नसीम, प्रा. पलाश फेड्डेवार, प्रा. प्रियंका शर्मा म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ. कार्तिक पनिकर, आयक्यूएसीचे समन्वयक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. विकास ढोमणे निवड झालेल्या या सर्व क्लब ऑफिसर चे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी सांगितले की, मागील वर्षी आमच्या महाविद्यालयाच्या सायबर योद्ध यांनी भंडारा जिल्ह्यातील चाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितेचे धडे दिले. यावर्षी आमचे विद्यार्थी अजून जोमाने कार्य करून अधिक टप्पा गाठतील असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की,इंटरनेटच्या या युगात सायबर सुरक्षा शिक्षण हे अपरिहार्य आहे. आणि हे शिक्षण देण्याचे कार्य आमच्या महाविद्यालयाचे सायबर योद्धे करणार आहेत.