शेलपिंपळगाव येथील श्री. शिवाजी विद्यालयाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीवितास धोका..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खेड तालुक्यातील शेलपिंपळगागावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री. शिवाजी विद्यालयाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे ऐन पावसाच्या दिवसात विद्यालयातील शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शिक्षण देणारे शिक्षक यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या विद्यालयाच्या इमारतीची इतकी दैनिय अवस्था झाली आहे कि, कित्येक महिन्यापासून शाळेच्या खोल्यांचे तुटलेले दरवाजे, जीर्ण भिंती याकडे गावातील पुढाऱ्यांचे, ग्रामस्थांचे व संस्थेच्या प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे. या विद्यालयात गावातीलच ७० ते ८० टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण तरीही गावातील जाणते आणि झोपेचे सोंग घेतलेले गावगाडा हाकणारे पुढारी आपल्या स्वतःच्या लेकरांचा जीव धोक्यात घालत आल्याचे दिसून आले आहे. विद्यालयाची इमारत साधारणतः ३० ते ३५ वर्ष जुनी असून इमारतीचे बांधकाम व इमारतीचे छत पूर्णतः जीर्ण झाले आहे. त्यामुळे कधी ही इमारत पडेल आणि कधी कोणती दुर्घटना घडेल हे सांगता येत नाही. आता चालू वर्षीच्या शाळा लवकर सुरु होणार आहेत. त्याअगोदर विद्यालयाच्या इमारतीची डागडुजी करण्याची मागणी काही सजक पालकांनी लावून धरली आहे. जर ज्या विद्यालयाला दरवाजे नाहीत, विद्यार्थ्यांसाठी सुखसुविधा नाहीत अशा शाळेत विद्यार्थी कसे पाठवायचे आणि अशा विद्यालयात विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी घ्यायला कुणी वाली नाही तर या विद्यालयात उत्तम शिक्षण कसे दिले जाईल असाही प्रश्न काही सामाजिक सलोखा राखणाऱ्या व विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजाची काळजी करणाऱ्या माजी विद्यार्थी यांनी उपस्थिती केला आहे. गावातील राजकीय अनास्थेपायी उत्तम चालणाऱ्या विद्यालयाची अशी भयाण अवस्था झाली आहे. त्याकडे राजकारणा विरहित वैचारिक सलोखा ठेवून सर्वांनी एकत्र येऊन काही तरी तोडगा काढायला हवा अशीही मागणी माजी विद्यार्थी यांनी केली आहे.

आता आपल्या स्वार्थी राजकारणापायी उज्ज्वल पिढी घडवीणाऱ्या शैक्षणिक मंदिराच्या दैनिय अवस्थेकडे कानाडोळा करणाऱ्या राजकारण्यांना देव सद्बुद्धी देवो हीच अपेक्षा..
