मोठी बातमी : आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या पतीचा व सासूचा नवा कारनामा उघड, महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

मोठी बातमी : आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या पतीचा व सासूचा नवा कारनामा उघड, महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

महाळुंगे(इं) : मागील काही दिवसापासून मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण महाराष्ट्रभर गाजत असतानाचं हगवणे कुटुंबातील वैष्णवी हगवनेचा पती शशांक हगवणे व त्याची आई लता हगवणे यांचा नवा कारनामा समोर आला आहे. दोघांवर जेसीबी मशीन व्यवहारात फसवणूक केल्या बद्दल महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात विविध कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून, महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निघोजे गावातील फिर्यादी प्रशांत अविनाश येळवंडे यांनी या हगवणे कुटुंबाकडून एका चारुदास बहिरट नामक व्यक्तीच्या निघोजे येथील फार्महाऊस वरती बऱ्याच दिवसापासून एक जेसेबी कामाविना उभा होता. त्यावर शेजारीच राहणाऱ्या प्रशांत हगवणे व चारुदास बहिरट यांची ओळख झाल्याने चारुदास यांनी उभा असलेला जेसेबी विकायचा आहे प्रशांत येळवंडे यांना बहिरट यांनी तुम्ही तो घ्या आणि शेतीला जोडधंदा सुरु करा असे सुचविले. त्यावर प्रशांत येळवंडे यांनी जेसेबी मशीनची माहिती घेतली असता तो जेसेबी रा.भूकुम ता.मुळशी,जि.पुणे यांचा असल्याचा व तो जेसेबी लता राजेंद्र हगवणे यांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली. माहिती काढल्यानंतर २० मार्च २०२२ रोजी शशांक हगवणे चारुदास बहिरट यांच्या निघोजे येथील फार्महाउसवर आले होते. त्यावेळी चारुदास बहिरट यांच्या मध्यस्थीने प्रशांत येळवंडे यांना २४ लाख रुपयांना व्यवहार ठरला. व्यवहार ठरल्यानंतर प्रशांत येळवंडे यांनी महाराष्ट्र बँकेचे ५ ल्कः रुपयांचे चेक लता हगवणे यांच्या नावाने दिला होता. त्यांना चेक दिला त्याच दिवशी प्रशांत येळवंडे यांना जेसेबी मशीनचा ताबाही दिला होता. उर्वरित ठरलेल्या व्यवहाराचे पैसे दरमहा ५० हजार याप्रमाणे देण्याचे ठरले होते तसा खरेदी पावतीही करण्यात आली होती. पण टी खरेदी पावती शशांक हगवणे याने स्वतःकडे ठेऊन घेतली होती.

जेसेबी मशीनवरील सर्व कर्ज शशांक हगवणे व लता हगवणे यांनी स्वतः भरून मशीनचे व्यवहाराची पूर्ण रक्कम मिळाल्यावर मशीन प्रशांत येळवंडे यांच्या नावावर करून देण्याची हमी हगवणे यांनी केली होती. फिर्यादी यांना मशीन ताब्यात भेटल्यानंतर त्यांनी व्यवसाय करून त्यातून व्यवहारापोटी ठरलेल्या ५० हजाराचा हफ्ता महिन्याच्या १८/१९ तारखीला लता हगवनेच्या बँक खात्यात भरत होते.त्यानंतर एक दिवस फिर्यादीचे मशीन चाकण येथे व्यवसायाच्या निमित्ताने चालवीत असताना त्या ठिकाणी इंडसइंड बँकेचे रिकव्हरी एजंट यांनी सदरचे जेसेबी मशिनवर असलेल्या कर्जाचे हफ्ते भरले नसल्याने सदर मशीन बँकेने जमा केले. त्यानंतर शशांक हगवणे याने काही दिवसात ते मशीन बँकेकडून सोडवून घेऊन त्याच्या ताब्यात घेतले.याबाबत फिर्यादी यांनी शशांक हगवणे व लता हगवणे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

यानंतर फिर्यादी यांनी ५० हजार रुपये प्रती महा हफ्त्या प्रमाणे तब्बल ११ लाख ७० हजार रुपये हगवणे कुटुंबाला बँक हफ्ते भरण्यासाठी दिले होते. त्यावर जेव्हा फिर्यादी मशीनची मागणी करण्यासाठी हगवणे कुटुंबाच्या घरी भूकुम,ता.मुळशी,जि पुणे येथे जात होते तेव्हा आमचे काम झाले आहे तुला काय करायचे कर,मशन तुला मिळणार नाही असे बोलत होते.फिर्यादी जेव्हा मशीनचे पैसे मागायचा हगवणे कुटुंबाकडे जात होते तेव्हा फिर्यादीला कुत्र्याची उपमा देऊन अतिशय तुच्च्तेची वागणूक हगवणे कुटुंबाकडून मिळत होती.तसेच शशांक हगवणे याने ज्या ज्यावेळी फिर्यादी त्यांच्याकडे पैसे मागायला गेले त्यावेळी कमरेला लावलेल्या पिस्तुलावर हात ठेऊन पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादीला हुसकावून देत असे. या प्रकरणात शशांक हगवणे व लता हगवणे यांचा राजकीय वरदहस्त बघता तसेच शशांकने दाखवलेला पिस्तुलाचा धाक यामुळे फिर्यादी घाबरून जाऊन आता पर्यंत त्यांच्या विरोधात तक्रार देण्याचे धाडस करत नव्हता. फिर्यादीने वडील आजारी असल्याने पैशाची गरज असल्याने हगवणे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड आयुक्तांलयात लेखी स्वरुपाची तक्रार दिली होती. तोच अर्ज चौकशीसाठी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात आल्यावर पोलीस ठाण्यात शशांक हगवणे स्वतः येवून फिर्यादीच्या वडिलांच्या उपचारासाठी एक लाख ऐंशी हजार रोख व तीन लाख वीस हजार चेकने देण्याची हमी वरिष्ठ अधिकारी यांच्यासमोर दिली होती. त्यानंतर आमच्यातील झालेला व्यवहार शशांक हगवणे याने पूर्ण केला नाही. त्यांच्याकडे पैशाची मागणी करूनही त्यांनी फिर्यादीला पैसे अथवा मशीन परत दिले नाही. त्यातच काही दिवस्पुर्वी शशांक हगवणे व कुटुंबातील इतर सदस्य यांच्यावर पत्नीच्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आल्याने फिर्यादीवरील दडपण कमी झाल्याने फिर्यादीने शशांक हगवणे व लता राजेंद्र हगवणे यांच्या विरुद्ध महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय दंड सहिता कलम ४२०,४०६,५०६(२),३४,शस्र अधिनियम कलम ३० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीकडून या गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींना कडक शासन व मला माझे जेसेबी मशीन माझ्या ताब्यात मिळावे अशी मागणी केली आहे.

समाज्यात अशा माज असणाऱ्या आणि कुटुंबातील लेकीबाळींना छेडणाऱ्या नराधमांना न्याय देवता शिक्षा देईलच. पण फक्त कुटुंबातील महिला सदस्यचं नाही तर समाजातील विविध घटकानाही अशा विकृती धारक लोकांचा त्रास असेल तर याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा नाहीतर यातून समाज विघातक प्रवृत्ती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाय हे करत आहेत.