यवतमाळ शहरात दिवसा ढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या...

यवतमाळ शहरात दिवसा ढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ

यवतमाळ शहरातील मध्य वस्तीत आज (8 जुलै) रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ शहरातील दत्त चौकात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; अज्ञात हल्लेखोरानी कार्तिक उर्फ सुजल कैथवास या युवकावर हल्ला करून निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल आहेत.

तर दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, खून कसा व का झाला याचा पोलीस तपास करत आहेत.