दिंडोरी येथे एलसीबीची मोठी कारवाई; १५०० किलो मावा जप्त...

दिंडोरी येथे एलसीबीची मोठी कारवाई; १५०० किलो मावा जप्त...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

 नाशिक मध्ये पुन्हा एक मोठी कारवाई करण्यात एलसीबीला यश आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्रंबकेश्वर मध्ये केमिकल युक्त खव्याची विक्री होत असल्याची कारवाई ताजी असतानाच; पुन्हा दिंडोरी तालुक्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सवामध्ये मोदक व तसेच पेढ्यांना, बर्फीला मागणी असते. या पार्श्वभूमीवर अवैधरित्या वाहतूक करताना १५०० किलो मावा व ब्लक स्वीट २,२७७०१ रुपये किमतीचा माल पकडला आहे. या कारवाईमध्ये नाशिक ग्रामीण पोलीसचे स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. नाशिक पेठ हायवे वरती ही कारवाई करण्यात आली आहे.